शिरपूर (वाशीम) : येत्या १९ ऑक्टोबर रोजी दिपावली असल्याने बाजारपेठ फुलली असून दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणा-या मातीच्या पणत्या (दिप) बनविण्यास कुंभारांनी सुरुवात केली आहे. बैलगाडीच्या चाकावर कुंभार पणत्या बनवून त्यावर इतर प्रक्रीयेनंतर त्या बाजारात विक्रीस आणल्या जात आहेत. शिरपूर जैन येथील कुंभार गल्लीतील अनेक घरात दिपावली निमित्त पणत्या, मापले, लक्ष्मी मूर्ती, लहान मुलांची मातीच्या खेळणे बनविण्यास सुरुवात झाली आहे.