वाशिम जिल्ह्यात गेल्या ९ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यादरम्यान शुक्रवार, २ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास काही माकडे रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील धरणामध्ये असलेल्या झाडावर चढली; मात्र बराच वेळ झालेल्या पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढून ८ माकडे सुमारे २० तास झाडावरच अडकली.