शासकीय कार्यालयांना जलपुनर्भरणाचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 01:01 PM2018-06-22T13:01:08+5:302018-06-22T13:01:33+5:30
वाशिम - दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरी वसाहतींसह प्रशासकीय कार्यालयांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून पावसाळ्यात पडणारे ...
वाशिम - दरवर्षीच्या उन्हाळ्यात नागरी वसाहतींसह प्रशासकीय कार्यालयांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत साठवून जलपुनर्भरण करणे आवश्यक ठरत आहे. मात्र, नागरिकांसोबतच जलपुनर्भरणाचा विसर पडला असून यासंदर्भातील कुठलीच व्यवस्था येथील एकाही कार्यालयावर अद्याप उभी झाल्याचे दिसत नाही. पावसाळ्यात छतावर पडणारी पावसाचे पाणी ठराविक यंत्रणा उभी करून त्याव्दारे कुपनलिकेच्या शेजारी साठविण्यात यावे, असे शासनाचेही निर्देश आहेत. याकडे प्रशासकीय कार्यालयांनी लक्ष पुरविल्यास आपसूकच समाजातही यायोगे प्रभावी जनजागृती होणे शक्य आहे. मात्र, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, नगर परिषद यासह इतरही प्रशासकीय कार्यालयांनी किमान सद्यातरी जलपुनर्भरणाच्या आवश्यक बाबीकडे लक्ष पुरविल्याचे दिसत नाही.