अंगणवाडी कर्मचा-यांचे जेलभरो आंदोलन, शेकडो अंगणवाडी कर्मचा-यांनी घेतला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 06:43 PM2017-10-05T18:43:15+5:302017-10-05T18:43:44+5:30
वाशिम: अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या ...
वाशिम: अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. आयटकच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी राज्यशासनाकडे सनदशीर मागार्ने मागणी केली. परंतु त्याची दखल शासनाने घेतली नाही. म्हणून सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाचा मार्ग अनुसरला आहे.