वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी मंगळवारी आमदार लखन मलिक व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी जागरण गोंधळ घालून आरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली. तसेच ४ ऑगस्टपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यात ७ ऑगस्ट रोजी समाजातील वकिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी भजन-किर्तनाच्या माध्यमातूनही आरक्षणाच्या मागणीची आरोळी ठोकण्यात आली.