वाशिम : शेतक-यांचा सच्चा मित्र म्हणून ओळखल्या जाणा-या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. हा सण रविवार, ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात हर्षोल्लासात साजरा झाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सर्जा-राजासोबत बळीराजानेही जल्लोष केला.