यवतमाळ : मानधन नको, वेतन हवे, अशी मागणी करीत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी शनिवारी जेलभरो आंदोलन केले. यवतमाळातील बसस्थानक चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडीतार्इंनी प्रचंड आक्रोश करत शासनविरोधी घोषणा दिल्या.