शासकीय रुग्णालय परिसरात डॉक्टरांचा 'डीजे'च्या तालावर डान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:35 PM2019-09-09T13:35:49+5:302019-09-09T13:36:47+5:30
ध्वनिक्षेपक कायद्याची पायमल्ली, रुग्णांना झाला त्रास
यवतमाळ : रुग्णालये, कोणत्याही धर्माची प्रार्थनास्थळे, शाळा, महाविद्यालये आदी 'नो लाऊड व्हॉइस झोन'मध्ये येतात. या ठिकाणाहून मिरवणूक काढताना ध्वनिक्षेपक किंवा डीजेच्या आवाज करून नाचत गाजत मिरवणू क काढणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. मात्र, या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढली. दरम्यान, डीजेच्या आवाजाचा रुग्णांना चांगलाच त्रास झाला. हा व्हिडीओ मोठया प्रमाणात वायरल होत आहे पण याकडे मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाकपणा केला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली