किशोर तिवारींविरोधात महसूल संघटना आक्रमक; महिला अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 11:18 AM2019-09-20T11:18:37+5:302019-09-20T11:19:07+5:30
यवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याविरोधात महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या ...
यवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याविरोधात महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्याबाबत अपशब्द बोलून अपमानित केल्याचा तिवारींवर आरोप आहे. याविरोधात महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. किशोर तिवारींचा निषेध नोंदवत संघटनांनी शुक्रवारी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तिवारींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.