WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरला ICCकडून वर्ल्ड कप तिकीट ऑफर; धोनीवरील ट्विटची घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 03:58 PM2019-01-23T15:58:01+5:302019-01-23T15:58:42+5:30
WWE आणि क्रिकेट पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबई : WWE आणि क्रिकेट पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरचा मॅनेजर पॉल हेयमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवली. ऑस्ट्रेलियातील वन डे मालिकेतील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या कॅप्टन कूल धोनीचे कौतुक करणारे ते ट्विटर होते. त्यावर हेयमॅनने प्रतिक्रिया नोंदवली. त्याची दखल घेत आयसीसीने हेयमॅन आणि लेसनर यांना चक्क वर्ल्ड कप तिकीट ऑफर केले.
Eat.
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 18, 2019
Sleep.
Finish games.
Repeat.
Life as @msdhoni. 😎 pic.twitter.com/5GXrzH0dtR
लेसनरचा मॅनेजर हेयमॅनने त्यावर मत नोंदवले की," #EatSleepConquerRepeat या माझ्या यशस्वी मंत्राचा वापर करून आयसीसीने महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे चांगले प्रमोशन केले आहे. त्याची रॉयल्टी त्यांनी मला द्यायला हवी आणि ती रोख, चेक, स्टॉक्स आदी कोणत्याही स्वरूपात दिली तरी चालेल."
My most (in)sincere compliments to @cricketworldcup for promoting the amazing @msdhoni by paraphrasing my mantra for @WWE#UniversalChampion@BrockLesnar#EatSleepConquerRepeat. Our royalties may be paid in cash, check, stock or cryptocurrency. https://t.co/sGtIALzso1
— Paul Heyman (@HeymanHustle) January 18, 2019
यानंतर क्रिकेट वर्ल्ड कप ट्विटर हँडलने हेयमॅनसह ब्रॉक लेसनरला इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट ऑफर केले. मात्र हेयमॅनचा काही वेगळा प्लान आहे.
How about tickets to the @cricketworldcup for you and @BrockLesnar? 🏏
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2019
तो म्हणतो," WWE युनिव्हर्सल चॅम्पियनला वर्ल्ड कप स्पर्धेचा जागतिक स्तरावर प्रचार वाढवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. तेथे येण्यासाठी तुम्ही आम्हाला आठ अंकी रक्कम द्याल अशी अपेक्षा."
. @cricketworldcup
— Paul Heyman (@HeymanHustle) January 21, 2019
Thank you for your interest in expanding your global audience even further by exploiting the fame/notoriety of #YourHumbleAdvocate and the reigning defending undisputed @WWE Universal Champion @BrockLesnar. I look forward to your 8 figure appearance fee offer. https://t.co/4GLsTDt2Zf