पंजाबी ड्रेस आणि कंबरेला ओढणी बांधून WWEच्या रिंगमध्ये उतरणारी भारतीय महिला खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 06:57 PM2017-09-06T18:57:02+5:302017-09-06T18:57:57+5:30

 द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

Indian women's player entering the WWE ring by wearing Punjabi dress and blanket | पंजाबी ड्रेस आणि कंबरेला ओढणी बांधून WWEच्या रिंगमध्ये उतरणारी भारतीय महिला खेळाडू

पंजाबी ड्रेस आणि कंबरेला ओढणी बांधून WWEच्या रिंगमध्ये उतरणारी भारतीय महिला खेळाडू

Next
ठळक मुद्दे द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.यंदा WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा कुणी पुरूष नसून एक महिला भारताचं प्रतिनिधित्व करते आहे.कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव आहे.

मुंबई, दि. 6-  द ग्रेट खली नंतर आता आणखी एक पैलवान वर्ल्ड रेसलिंग एण्टरटेन्मेंट अर्थात WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. पण यंदा WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा कुणी पुरूष नसून एक महिला भारताचं प्रतिनिधित्व करते आहे. कविता देवी असं या महिला रेसलरचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे कविता देवी इतर महिला रेसलर्सप्रमाणे, WWE च्या कॉश्च्युममध्ये मैदानात उतरत नाही, तर पारंपारिक पंजाबी ड्रेसवर रिंगमध्ये उतरते. ओढणी कमरेला बांधून प्रतिस्पर्धी महिलेला भारतीय ठोसे लगावून विजय मिळवणं, ही कविता देवीची खासियत आहे. सोशल मीडियावरही सध्या कविता देवीची आणि तिच्या खेळाची चर्चा रंगली आहे. 

कविता देवी ही पहिली भारतीय महिला आहे, जी WWE मध्ये सहभागी झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे कविता देवीचा प्रशिक्षक स्वतः द ग्रेट खली हाच आहे. पंजाबी ड्रेस परिधान परिधान करुन, रिंगमध्ये उतरून प्रतिस्पर्धीसमोर उत्तम खेळ करणाऱ्या कविता देवीचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यूझीलंडची महिला रेसलर डकोटा कायने आणि कविता देवीचा रेसलिंग व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. तीस ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला अवघ्या काही वेळातच 35 लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

महिलांच्या स्पर्धेत कविता देवीने आपल्या खेळाने आणि देसी अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात कविता देवीचा न्यूझीलंडच्या डकोटा कायकडून पराभव झाला. पण कविता देवीची फाईट पाहून मात्र चर्चेचा विषय आहे. 

नेमकी कोण आहे कविता देवी?
- WWE मध्ये प्रतिनिधित्त्व करणारी पहिली भारतीय महिला
- कविता देवी हरियाणातील मालवी या खेड्यातील राहणारी आहे.
- कविता देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्ट क्रीडाप्रकारात भारताचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.
- 2016 मध्ये 75 किलो वजनी गटात पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.
- क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे हरियाणा सरकारने तिला पोलिस दलात नोकरी दिली.
-  पोलीस दलात ती कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मात्र 2010 मध्ये ती पोलीस उपनिरीक्षकपदावर निवृत्त झाली.
- खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने नोकरी सोडली.
- कविता देवीला भारतीय रेसलर ग्रेट खलीने प्रशिक्षण दिलं आहे

Web Title: Indian women's player entering the WWE ring by wearing Punjabi dress and blanket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.