WWE Raw च्या महिला खेळाडूंना अटक; पोलिसांच्या गाडीतही हाणामारी, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:37 PM2019-04-02T15:37:54+5:302019-04-02T15:38:09+5:30
महिला खेळाडूंसाठी प्रथमच WWEने Wrestle Maniaचे दार उघडण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला.
लंडन : महिला खेळाडूंसाठी प्रथमच WWEने Wrestle Maniaचे दार उघडण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. त्यामुळे Raw Women’s Championshipसाठी रोंडा रौसी, चार्लोट फ्लेर आणि बेकी लिंच यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. त्यात स्टेफनी मॅकमॅहोनच्या एका घोषणेनं या स्पर्धेची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. त्यानुसार रौसी, फ्लेर आणि लिंच यांच्यातील विजेती खेळाडू थेट Raw आणि SmackDown विजेती ठरणार आहे.
या स्पर्धेपूर्वी या तिघींनी एका स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात रौसीने लीव्ह मॉर्गनला नमवून बाजी मारली आणि संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतरही या रौसी, लिच आणि चार्लोट यांच्यात हाणामारी सुरूच राहिली आणि त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
🛎🛎🛎🛎🛎🛎🛎
— WWE (@WWE) April 2, 2019
Match over. It's ON! #RAW@RondaRouseypic.twitter.com/bGDxJZ1EDL
पण, या तिघींना पोलिसांना आवरणेही अवघड झाले आणि त्यांनी तिघींना बेड्या ठोकल्या. रौसी आणि चार्लोट यांना एकाच गाडीत बसवण्यात आले आणि त्यातही या दोघींनी एकमेकींना मारले. त्या पोलिसांच्या गाडीची काच तुटली.
THIS. IS. OUT. OF. CONTROL. #Raw@RondaRousey @BeckyLynchWWE @MsCharlotteWWEpic.twitter.com/X86C4t0Uyu
— WWE (@WWE) April 2, 2019