Video: कहानी में ट्विस्टः बॉबी लॅश्ली - लानाच्या लग्नात 'तिची' एन्ट्री अन् घडलं भयानक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:10 IST2020-01-02T13:04:36+5:302020-01-02T13:10:46+5:30

पती, पत्नी और वो मध्ये फसला तो...

WWE : Liv Morgan returns to drop a bombshell during Lana and Bobby Lasley wedding | Video: कहानी में ट्विस्टः बॉबी लॅश्ली - लानाच्या लग्नात 'तिची' एन्ट्री अन् घडलं भयानक

Video: कहानी में ट्विस्टः बॉबी लॅश्ली - लानाच्या लग्नात 'तिची' एन्ट्री अन् घडलं भयानक

WWE च्या रिंगमध्ये सध्या हाणामारीपेक्षा अधिक चर्चा रंगत्येय ती बॉबी लॅश्ली अन् लाना यांच्यातल्या प्रेमाची... या प्रेमात ट्रांयगल आहे. बॉबी आणि लाना यांच्या प्रेमात रुसेव्ह हा होता. आता त्यात आणखी एकीची भर पडली आहे. पण, एन्ट्री घेतलेल्या तिचा थेट लानाशी संबंध असल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. बॉबी आणि लाना यांचा विवाह रिंगमध्ये सुरू असताना तिच्या एन्ट्रीनं सर्वांना चकित केलं आणि त्यानंतर जे काही घडलं ते पाहायलाच हवं...

काही दिवसांपूर्वी रुसेव्हची मॅच सुरु असताना बॉबीनं अचानक स्टेडियममध्ये एन्ट्री घेतली. काही वेळानंतर त्यानं लानाला  ( महिला रेसरल) बोलावलं आणि रुसेव्ह मॅच सोडून बॉबीकडे पाहत राहिला. लाना ही ही रुसेव्हची पत्नी आणि WWEची रेसलर आहे. 2016मध्ये रुसेव्ह व लाना यांनी लग्न केले. पण, मॅच सुरू असताना अचानक लाना आल्यानं त्याला धक्काच बसला. पण, त्यानंतर जे घडले हे त्यालाही अपेक्षित नव्हते. WWEच्या रिंगमध्ये लाना आणि बॉबी यांचा रोमान्स सुरू झाला. या दोघांचे लिपलॉप पाहून रुसेव्ह अचंबित झाला.

त्यानंतर बॉबी आणि लाना यांनी लग्न करण्याचे जाहीर केले होते. पण, यांच्या लग्नसोहळ्यातही ट्विस्ट आला. बॉबी जेव्हा लानाला रिंग घालणार तितक्यात महिला रेसलर लिव्ह मॉर्गनची एन्ट्री झाली. तिनं या लग्नाला विरोध करताना लाना आणि तिचे संबंध असल्याचे जाहीर केले. तिच्या या खुलास्यावर लानानंही आश्चर्य व्यक्त केले. लानासोबत गेली अनेक वर्ष माझे संबंध असल्याचा दावा लिव्हनं केला. लिव्ह इथेच थांबली नाही, तर तिनं चक्क रिंगमध्ये प्रवेश करताना लानासोबत हाणामारी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाला.

पाहा संपूर्ण व्हिडीओ..

Web Title: WWE : Liv Morgan returns to drop a bombshell during Lana and Bobby Lasley wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.