Sushant Singh Rajput Suicide: WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 11:28 IST2020-06-15T11:26:07+5:302020-06-15T11:28:32+5:30
WWE स्टार जॉन सीनानं बॉलिवूड दिग्गज रिषी कपूर आणि इरफान खान यांनाही श्रद्धांजली वाहिली होती.

Sushant Singh Rajput Suicide: WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका पडद्यावर हुबेहूब साकारणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांनी सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली. WWE सुपरस्टार जॉन सीनानंही त्याला श्रद्धांजली वाहिली.
OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!
पवित्र रिश्ता या मालिकेनंतर काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुशांतनं अनेक हिट चित्रपट दिले. धोनीच्या बायोपिकमधील त्याच्या भूमिकेचं सर्वांनी भरभरून कौतुक केलं. भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्तेचे वृत्त कळताच धक्का बसला. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. त्याचा परिवार आणि मित्रांना या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी शक्ती मिळो.’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने मी स्तब्ध आणि दु:खी आहे. तो खूप युवा व अत्यंत गुणवान अभिनेता होता. त्याच्या परिवार, मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.
WWE स्टार जॉन सीना यानेही सोशल मीडियावरून सुशांतला श्रद्धांजली वाहिली. त्यानं सुशांतचा फोटो पोस्ट करून ही श्रद्धांजली वाहिली.
यापूर्वी सीनानं बॉलिवूड दिग्गज रिषी कपूर आणि इरफान खान यांनाही श्रद्धांजली वाहिली होती. अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, माजी नेमबाज राज्यवर्धन राठोड, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल. क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती यांनीही सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली.