दिल्लीच्या कुटुंबावर यवतमाळमध्ये काळाचा घाला; अपघातात 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 07:30 AM2018-06-01T07:30:41+5:302018-06-01T08:27:15+5:30

अपघातात दोनजण गंभीर जखमी

10 punjab residents died in accident in yavatmal | दिल्लीच्या कुटुंबावर यवतमाळमध्ये काळाचा घाला; अपघातात 10 जणांचा मृत्यू

दिल्लीच्या कुटुंबावर यवतमाळमध्ये काळाचा घाला; अपघातात 10 जणांचा मृत्यू

googlenewsNext

यवतमाळ:  नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये दर्शनासाठी जात असताना कोसदनी घाटात हा अपघात झाला.

दिल्लीतील शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला आलं होतं. हे कुटुंब तीन गाड्यांमधून प्रवास करत होतं. यातील एका गाडीला कोसदनी घाटात भीषण अपघात झाला. गाडीला ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: 10 punjab residents died in accident in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.