१० हजार हेक्टरला अवकाळीचा फटका

By admin | Published: March 18, 2017 12:41 AM2017-03-18T00:41:32+5:302017-03-18T00:41:32+5:30

गुरूवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. गारपीट, वादळ आणि अवकाळी पावसाने दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

10 thousand hectares of incident | १० हजार हेक्टरला अवकाळीचा फटका

१० हजार हेक्टरला अवकाळीचा फटका

Next

८५० घरांची पडझड : ३४१ गावे सर्वाधिक बाधित, दहा तालुक्यात पिकांचे नुकसान
यवतमाळ : गुरूवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. गारपीट, वादळ आणि अवकाळी पावसाने दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घाटंजी तालुक्यात ८५० घरांची पडझड झाली असून १० तालुक्यांमध्ये नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश कृषी विभागाने दिले.
गुरूवारी जिल्ह्यात सर्वत्र वादळ, गारपीट आणि पावसाने हजेरी लावली. यात शेतीमालाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने घाटंजी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. या तालुक्यात अर्धा तास गारपीट झाली. अवेळी आलेल्या गारपिटीने गहू, हरभरा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. हरभऱ्याच्या घाट्या गळून पडल्या, तर गहू आडवा झाला. कैऱ्याही गळून पडल्या. संत्रा आणि भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली. या तालुक्यातील ८५० घरांमध्ये चूलही पेटली नाही. या वादळाचा जिल्ह्यातील जवळपास ३४१ गावांना तडाखा बसला.
यवतमाळ, कळंब, नेर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पुसद, पांढरकवडा व झरी तालुक्यातही गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांची हानी झाली. प्रत्येक तालुक्यात किमान एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. शुक्रवारी तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले. पर्यवेक्षकांनी गाव पातळीवर शुक्रवारी आढावा घेण्यास सुरूवात केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. प्रत्यक्ष अहवालानंतर नुकसानीची आकडेवारी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ८० हजार हेक्टरवर रबीची लागवड झाली. यात हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक आहे. सध्या काढणीला आलेला हरभरा आणि गहू गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (शहर वार्ताहर)

 

Web Title: 10 thousand hectares of incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.