24 तासात 1082 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 102 नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 06:26 PM2020-10-16T18:26:54+5:302020-10-16T18:26:59+5:30
चार जणांचा मृत्यु ; 54 जणांना सुट्टी
यवतमाळ: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा वेग मंदावला असून निगेटिव्ह असणा-यांची संख्या वाढत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी गत 24 तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तर 102 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 62 व 60 वर्षीय पुरुष आणि 69 वर्षीय महिला तसेच दारव्हा तालुक्यातील 63 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 1184 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 102 नव्याने पॉझेटिव्ह तर 1082 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 473 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9338 झाली आहे. आज (दि.16) 54 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8399 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 297 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 84059 नमुने पाठविले असून यापैकी 83234 प्राप्त तर 825 अप्राप्त आहेत. तसेच 73896 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.