‘मोनसॅन्टो’ला ११ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 09:50 PM2018-07-30T21:50:35+5:302018-07-30T21:50:54+5:30
कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.
Next
ठळक मुद्देग्राहक न्यायालय : पाच शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोकला आहे.
कृष्णराव देशट्टीवार (पांढरकवडा), विलास देशट्टीवार व दीपक राठोड (वाघोली), उत्तम झिपा चव्हाण (वसंतनगर) आणि गणेश जाधव (चोपण ता. केळापूर) या शेतकऱ्यांनी ‘मोनसॅन्टो’ कंपनीचे बियाणे खरेदी करून शेतात टोबले. उगवण चांगली झाली. पीक वाढून फुलावर असताना कपाशीची झाडे वाळू लागली. ही बाब सदर शेतकऱ्यांनी पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि गठित समितीने या शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीची पाहणी केली. अजैविक पान असल्याने कपाशीचे पीक वाळून या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट नमुद करण्यात आले.
कृषी विभागाच्या अहवालानंतर या शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र टाळाटाळ सुरू केल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. बियाण्यांमध्ये अजैविक ताण सहन करण्याची शक्ती नाही म्हणजेच बियाणे सदोष आहे, या निर्णयाप्रत मंच पोहोचले. झालेल्या नुकसानीपोटी कंपनीने विकास देशट्टीवार यांना पाच लाख २० हजार, विलास देशट्टीवार यांना ९० हजार, दीपक राठोड ३६ हजार, उत्तम चव्हाण ६८ हजार आणि गणेश जाधव यांना तीन लाख ९६ हजार रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मंचाने दिला आहे. सदर शेतकऱ्यांना शारीरिक व मानसिक त्रास तसेच तक्रार खर्चापोटी रक्कम द्यावी, असा निर्णय मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य अॅड. आश्लेषा दिघाडे, सुहास आळशी यांनी दिला आहे.
५५ न्यायनिवाडे दाखल
‘मोनसॅन्टो’ कंपनीने लेखी युक्तीवादासोबत ५५ व इतर वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले होते. याचे बारकाईने अवलोकन केले असता त्यातील परिस्थिती आणि सदर पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे सदर न्यायनिवाडे याप्रकरणाला लागू होत नाही, असे मंचाने निकालपत्रात म्हटले आहे.