गावातील नळ योजनेची मोटार दुरुस्ती करताना ११ जण विहिरीत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 08:48 PM2023-05-26T20:48:43+5:302023-05-26T20:49:03+5:30

Yawatmal News पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटर दुरुस्त करताना, विहिरीवरील जाळी तुटल्याने ११ जण पाण्यात कोसळले. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

11 persons fell into the well while repairing the motor of the tap scheme in the village | गावातील नळ योजनेची मोटार दुरुस्ती करताना ११ जण विहिरीत कोसळले

गावातील नळ योजनेची मोटार दुरुस्ती करताना ११ जण विहिरीत कोसळले

googlenewsNext

यवतमाळ  : लासीना येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील नळ योजनेचा मोटारपंप बिघडला. त्यामुळे दोन दिवसांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. ही समस्या निकाली काढण्यासाठी सरपंच व सदस्यांनी दहाजणांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी ११ वाजता मोटार दुरुस्तीचा प्रयत्न सुरू केला. विहिरीच्या जाळीवर उभे राहून मोटार काढत असतानाच संपूर्ण जाळी तुटली. त्यामुळे ११ जण विहिरीत कोसळले. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.


गावाला पाणीपुरवठा करणारी मोटारपंप बंद पडली. ती दुरुस्त करण्यासाठी खासगी वायरमन नीलेश मानकर, गजानन गेडाम, मोरेश्वर मांजरे, कन्हैया, गुरु राठोड, विनोद कुंभेकार, श्रीराम पवार, कार्तिक दुधे यांच्यासह ११ जण विहिरीच्या जाळीवर चढले. दोराने बांधून मोटार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच दरम्यान ती लोखंडी जाळी तुटली व अकराहीजण क्षणार्धात विहिरीत कोसळले. या जाळीवरच वीजपुरवठा करणारा स्वीच बाॅक्स बसविण्यात आला होता. जिवंत विद्युत तारेसह हा बाॅक्स विहिरीच्या पाण्यावर लटकला. वीज तारांचा पाण्यात स्पर्श झाला नाही. त्यामुळे अकराही जणांचा थाेडक्यात जीव वाचला.

अपघात झाल्याची घटना गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. कसेबसे एक-एक करून सर्वांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. विहिरीत कोसळलेल्या ११ जणांपैकी कुणालाही दुखापत झाली नाही. सर्वांनी बाहेर आल्यानंतर दैव बलवत्तर म्हणून वाचलो, अशी प्रतिक्रिया दिली. या अपघाताने लासीना येथील पाणीटंचाई आणखी पुढील काही दिवस कायम राहणार आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: 11 persons fell into the well while repairing the motor of the tap scheme in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात