पीक विम्याचे ११७ कोटी बँक खात्यात

By admin | Published: July 25, 2016 12:53 AM2016-07-25T00:53:08+5:302016-07-25T00:53:08+5:30

जिल्ह्यात खरीप २०१५ च्या हंगामासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करण्यात आली होती.

117 crore bank accounts of crop insurance | पीक विम्याचे ११७ कोटी बँक खात्यात

पीक विम्याचे ११७ कोटी बँक खात्यात

Next

तर चौकशी करा : दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ, गतवर्षातील खरीप हंगाम
यवतमाळ : जिल्ह्यात खरीप २०१५ च्या हंगामासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करण्यात आली होती. या अंतर्गत भाग घेतलेल्या एक लाख ८९ हजार शेतकऱ्यांना विम्याच्या नुकसान भरपाईपोटी ११७ कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्यापोटी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
पीक विम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची सभा झाली. यात अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याचे सांगितले. पीक विमा भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे, परंतु रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन चौकशी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: 117 crore bank accounts of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.