१००६ गावांसाठी १२ कोटी
By Admin | Published: January 1, 2016 03:37 AM2016-01-01T03:37:02+5:302016-01-01T03:37:02+5:30
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आला आहे. यामध्ये एक हजार
यवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला आला आहे. यामध्ये एक हजार सहा गावांचा समावेश असुन त्या ठिकाणी १ हजार ३२ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत.
दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेने पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये विंधन विहिरी दुरूस्त करणे, तात्पूरती पूरक नळयोजना घेणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहीर अधिग्रहीत करणे, गाळ काढणे, टँकर आणि बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा करणे यासह विविध उपाय योजनांचा समावेश आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत ७०५ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ७२८ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याकरिता ११ कोटी १३ लाख ५७ हजार रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान ३०१ गावांमध्ये टंचाईचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता आहे. तेथे ३०४ उपाय योजना सूचविण्यात आल्या आहेत. त्याकरिता एक कोटी २९ लाख ४० हजार रूपये लागणार आहेत. या संपूर्ण उपाययोजनेसाठी १२ कोटी ४२ लाख ९७ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसत आहे.