पावसाळ्यात १२ प्रकल्प कोरडे

By admin | Published: July 6, 2017 12:35 AM2017-07-06T00:35:55+5:302017-07-06T00:35:55+5:30

पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी जिल्ह्यातील १२ प्रकल्पात अद्याप पाणीसाठा नाही.

12 projects dry during monsoon | पावसाळ्यात १२ प्रकल्प कोरडे

पावसाळ्यात १२ प्रकल्प कोरडे

Next

२० टक्केच जलसाठा : सिंचन प्रकल्पात पाणीच उरले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी जिल्ह्यातील १२ प्रकल्पात अद्याप पाणीसाठा नाही. धो-धो पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूरही गेला नाही. परिणामी विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यात अद्यापही घट नोंदविली जात आहे. या प्रकल्पांत केवळ २० टक्के पाणी असून १२ प्रकल्प तर कोरडे ठण पडले आहेत.
जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम, तर ६२ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात मोठ्या पूस प्रकल्पात १५.६८ टक्के पाणी शिल्लक आहे. गोकीत १०.५८ टक्के, तर वाघाडी प्रकल्पात १७.२२ टक्के पाणी आहे. सायखेडा प्रकल्पात ३४.९५, लोअरपूसमध्ये ४४.३९, तर बोरगावमध्ये केवळ ०.७६ टक्के पाणी शिल्लक आहे.
६२ लघु प्रकल्पांत १५.१६ टक्के पाणी शिल्लक आहे. यापैकी सिंगनडोह, लोहतवाडी, नेर, खरद, घाटाना, किन्ही, मारेगाव, दुधाना, पहूर- ईजारा, बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी या १२ लघु प्रकल्पांमध्ये सध्या ठणठणाट आहे.

Web Title: 12 projects dry during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.