भांडेगावात कावीळचे १२00 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:18 PM2019-03-17T22:18:38+5:302019-03-17T22:19:41+5:30

तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.

1200 patients suffering from jaundice | भांडेगावात कावीळचे १२00 रुग्ण

भांडेगावात कावीळचे १२00 रुग्ण

Next
ठळक मुद्देगावकरी भयभीत : अद्याप नियंत्रण नाही

मुकेश इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.
आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेऊन तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भांडेगाववासी कावीळशी झुंज देत आहे. सध्या रुग्ण संख्या बाराशेवर पोहोचली आहे. आरोग्य विभाग रुग्णांवर उपचार व रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अपयश आले. तीन हजार ७२३ लोकसंख्येच्या या गावात डिसेंबरपासून कावीळ साथ सुरू झाली.
जानेवारीत रुग्णसंख्या पाचशेवर पोहोचली. सध्या बाराशे गावकऱ्यांना कावीळने ग्रासले आहे. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी स्थानिक आरोग्य यंत्रणेला माहिती दिल्यानंतर एक डॉक्टर व परिचारिका गावात पाठवून उपचार सुरु केले. परंतु दिवसेंदिवस रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे उपाययोजना कुचकामी ठरली. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर खऱ्या अर्थाने यंत्रणा कामाला लागली.
आरोग्य सहसंचालक प्रदीप आहुते व पुणे येथील पाणी गुणवत्ता विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी वाघमारे यांनी भेट देऊन आरोग्य अधिकारी व गावकऱ्यांशी चर्चा केली. नंतर पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक आले. त्यांनी पाण्याचे नमुने घेतले. रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांच्या शौच व रक्ताचेही नमुने घेतले. पुणे येथील विषाणू संस्थेच्या डॉ.अनुराधा त्रिपाठी, डॉ.रानोडे व उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोषटवार यांनीही पाणी, शौच व रक्ताचे नमुने घेतले. दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटी व आरोग्य विभागाच्या उपचारानंतरसुद्धा या रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही.
पाणीपुरवठ्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष
पिण्याच्या पाण्यातून ‘हिपेटायटिस ई’ हा व्हायरस शरीरात गेल्यास हा आजार बळावतो. भांडेगाव येथील काही रुग्णांच्या चाचणीत हा व्हायरस आढळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या साथीला पाणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. तरीही पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण होत असल्याचे स्पष्ट आहे, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

Web Title: 1200 patients suffering from jaundice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य