पुसद उपविभागात १२१ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:31 AM2021-05-30T04:31:49+5:302021-05-30T04:31:49+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद शाखेतर्फे विभागीय अध्यक्ष प्रा. शिवाजी राठोड, संचालक प्रकाश पाटील देवसरकर, अनुकूल चव्हाण, स्मिता पाटील ...

121 crore crop loan disbursement in Pusad sub-division | पुसद उपविभागात १२१ कोटींचे पीक कर्ज वाटप

पुसद उपविभागात १२१ कोटींचे पीक कर्ज वाटप

Next

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद शाखेतर्फे विभागीय अध्यक्ष प्रा. शिवाजी राठोड, संचालक प्रकाश पाटील देवसरकर, अनुकूल चव्हाण, स्मिता पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली १२१ कोटी रुपयांचे कर्ज उपविभागातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या कर्जाचा मार्च अखेरपर्यंत भरणा केला, त्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ देण्यात आल्याची माहिती बँकेचे विभागीय अधिकारी धर्मेंद्र जळगावकर यांनी दिली.

बँकेने २०२१-२२ खरीप हंगामासाठी उपविभागातील उमरखेड, महागाव व पुसद या तीन तालुक्यांपैकी पुसद तालुक्यातील ३७ सहकारी सोसायट्यांमधील आठ हजार ८३९ सभासदांना नऊ हजार ४०५.७३ हेक्टर क्षेत्रासाठी सर्वाधिक ५२ कोटी ५९ लाख २४ हजार रुपयांचे वाटप केले आहे. उमरखेड तालुक्यातील ५२ पैकी ४९ सोसायट्यांमधील सहा हजार २१५ सभासदांना सहा हजार १३७.९१ हेक्टरसाठी ३३ कोटी ३१ लाख ८२ हजार, तर महागाव तालुक्यातील २८ पैकी २७ सोसायट्यांमधील चार हजार ६७७ सभासदांना पाच हजार ३४०.३९ हेक्टरसाठी २८ कोटी ७९ लाख आठ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

बॉक्स

पुसदने वसुलीतही गाठला उच्चांक

खरीप पीक कर्ज वाटपासाठी पुसद तालुक्याचे वसुली अधिकारी सुधाकर पुलाते, उमरखेडचे संचालक प्रकाश देवसरकर, महागावचे सुरेश भरवाडे आदींनी संस्था सचिवांच्या सहकार्याने परिश्रम घेतले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुसद, दारव्हा, यवतमाळ, वणी व पांढरकवडा असे एकूण पाच उपविभाग आहे. वणी वगळता वसुलीच्याबाबतीत पुसद उपविभागाने उच्चांक गाठल्याचे बँकेचे विभागीय अधिकारी धर्मेंद्र जळगावकर यांनी सांगितले.

Web Title: 121 crore crop loan disbursement in Pusad sub-division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.