कत्तलीसाठी जाणाऱ्या १३ जनावरांची सुटका

By admin | Published: August 29, 2016 12:54 AM2016-08-29T00:54:27+5:302016-08-29T00:54:27+5:30

लगतच्या तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १३ जनावरांची येथील रामनवमी जन्मोत्सव

13 rescued animals released for slaughter | कत्तलीसाठी जाणाऱ्या १३ जनावरांची सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या १३ जनावरांची सुटका

Next

मुकुटबन : लगतच्या तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १३ जनावरांची येथील रामनवमी जन्मोत्सव सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी सुटका केली.
शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मुकुटबनहून पिंपरड-परसोडामार्गे तेलंगणात १३ जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती येथील रामनवमी जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी याबात पोलिसांनाही माहिती दिली. माहितीच्या आधारावर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहनाला अडवून त्याची तपासणी केली असता, आत १३ जनावरे आढळून आली. या जनावरांची कार्यकर्त्यांनी सुटका केली.
याप्रकरणी पोलिसांनी शे.सबीर शे.सत्तार रा.आदिलाबाद, सै.गफार रा.मुकुटबन, सुभाष ताजने, नरसिमलु मंदुलवार, शे.सुभान शे.रहीम रा.पाटण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पाच जणांविरूद्ध गोहत्या बंदी कायद्यांतर्गत कलम ५ (ब) ११, अ, फ, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अ‍े.आय.खान, ए.पी.आय. महादेव पडघन, जमादार अशोक नैैताम, प्रदीप कवरासे, संदीप सोयाम, उमेश कुमरे, टोंगे यांनी केली. या १३ जनावरांची किंमत ८० हजार रूपये असून त्यांची रासा येथील संस्कार माऊली गोरक्षणात रवानगी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून तस्करीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 13 rescued animals released for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.