‘जेडीआयईटी’चे १३ विद्यार्थी नामांकित कंपनीत
By admin | Published: April 18, 2016 04:53 AM2016-04-18T04:53:40+5:302016-04-18T04:53:40+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांची हेक्झा मल्टीलिंक सिस्टीम प्रा.लि. नागपूर या
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १३ विद्यार्थ्यांची हेक्झा मल्टीलिंक सिस्टीम प्रा.लि. नागपूर या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. त्यांना कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयात ग्रॅज्यूएट इंजिनिअर ट्रेनी या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे.
कंपनीने राबविलेल्या निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतील अंतिम वर्षाचे पात्र विद्यार्थी सहभागी झाले होते. अॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू, एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेतून श्रृती दारव्हटकर, जयश्री कौरसे, मीनाक्षी झेंडेकर, मयूर कराळे, उपेंद्र रामटेके, अभिजित ठाकरे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून मोहित कोठारी, पल्लवी नेवारे, श्रावणी पद्मावार आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतून विवेक कुंभारे, दिवेश उघडे, प्रेरणा काजाळे, नितीन सुतसोनकर यांची या कंपनीत निवड झाली आहे. (वार्ताहर)