‘समन्वय’ची १३ हजार मते संघाच्या जिव्हारी

By admin | Published: January 19, 2016 03:32 AM2016-01-19T03:32:27+5:302016-01-19T03:32:27+5:30

यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आपल्याकडे संपूर्ण राजकीय शक्ती, मंत्री-

13 thousand votes of 'coordination' team jivari | ‘समन्वय’ची १३ हजार मते संघाच्या जिव्हारी

‘समन्वय’ची १३ हजार मते संघाच्या जिव्हारी

Next

संघ परिवारात चिंतन : यवतमाळ अर्बन बँक निवडणूक रद्दची हूरहूर, ‘कॅव्हेट’ दाखल, राखीव निकालावर आज सुनावणी
यवतमाळ : यवतमाळ अर्बन को.आॅप. बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आपल्याकडे संपूर्ण राजकीय शक्ती, मंत्री-आमदारांसारखे स्टार प्रचारक असतानाही समन्वय पॅनलला मिळालेली १३ हजारांवर मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिव्हारी लागली आहेत. मोटरच्या या लांबलचक प्रवासाने संघ परिवाराला ग्रासले असून आपला आदेश नेमका कुठे अव्हेरला गेला यावर चिंतन केले जात आहे.
संघ परिवार कुठेच प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात उतरणार नाही, अशी घोषणा सरसंघचालकांनी अलीकडेच केली होती. मात्र त्याला छेद देऊन संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय आखाडा लढविला. त्यांनी १८०० कोटींच्या या यवतमाळ अर्बन बँकेची ही निवडणूक सहकार पॅनलसाठी अत्यंत प्रतिष्ठेची केली. भाजपाचे मंत्री, आमदार आणि संपूर्ण संघ परिवार या निवडणुकीत उतरला होता. ते पाहता समन्वय पॅनलच्या उमेदवारांना जास्तीत जास्त दोन ते अडीच हजार मते मिळतील, असा अंदाज होता. मात्र प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी १३ हजारांवर मते घेतली. कुणीही पाठीशी नसताना आणि अखेरच्या क्षणी एक मोठा समाज, शेकडो सैनिक नैराश्यात बुडाले असतानाही समन्वयची मोटार १३ हजार किलोमीटर धावली. नेमकी हीच बाब संघ परिवाराला जिव्हारी लागली. समन्वय पॅनल विजयाच्या जवळपास पोहोचले होते. अखेरच्या क्षणी समाज व सैनिकांवर ‘वार’ झाला नसता तर कदाचित समन्वयने विजयश्रीही खेचून आणली असती, असे मानले जाते. समन्वय पॅनल नेमके कुठे वाढले यावर संघ परिवारात गांभीर्याने चिंतन सुरू आहे. या १३ हजार मतांपुढे सहकार पॅनलला आपली विजयश्री आता ठेंगणी वाटू लागली आहे.
समन्वय पॅनलकडून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता पाहता सहकारने नागपूर उच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केला आहे. दरम्यान तीन उमेदवारांच्या रोखलेल्या निकालावर मंगळवारी १९ जानेवारीला सुनावणी होऊ घातली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

मोठ्या समाजात पडले दोन गट
४यवतमाळ अर्बनच्या निवडणुकीत व्यापार क्षेत्रात पाय रोवलेल्या एका मोठ्या समाजातही दोन गट पडले आहेत. या समाजाचे उमेदवार दोनही पॅनलमध्ये उभे असताना या समाजाच्या बँकिंग क्षेत्रातील एका नेत्याने केवळ सहकार पॅनलमधील उमेदवारांसाठीच ‘ताकद’ लावली. त्यामुळे ‘समन्वय’मधील उमेदवार व त्यांचे पाठीराखे नाराज झाले. या नेत्याला धडा शिकविण्यासाठी आता पराभूत समन्वय पॅनलने ‘त्या’ बँकेतही आपले पॅनल उतरविण्याचा निर्धार केला आहे. येथे पराभूत झालो, तेथे पराभूत करु, अशी त्यांची भूमिका आहे.

संघाने सहा बँका ताब्यात घेतल्या, आणखी दोन निशाण्यावर
४यवतमाळ अर्बन बँकेच्या निमित्ताने संघ परिवाराने ही सलग सहावी बँक आपल्या ताब्यात घेतली आहे. मूळ संघाची व नंतर संघेत्तरांच्या हातात गेलेल्या बँकांवर संघ परिवाराने लक्ष्य केंद्रीत केले आहे. आतापर्यंत पाच बँका त्यांनी ताब्यात घेतल्या. यवतमाळातही अर्बन बँक ताब्यात घेण्याची व्युहरचना करण्यासाठी संघाने तिघांना पाठविले होते.
४यवतमाळ जिल्ह्यातील आणखी दोन बँका संघाच्या निशाण्यावर आहेत. ‘घरातच लाभार्थी’ या मुद्यावर कायदेशीर लढा देऊन यंदाच जूनमध्ये एका बँकेच्या २० हजार मतदारांचे ‘ब्रेन वॉश’ करण्याचा व या बँकेत संपूर्ण संघाच्या लोकांना संचालकांच्या खुर्चीत बसविण्याचे नियोजन सुरू आहे. विशेष असे, या बँकेत दोन हजारांवर मुस्लिम मतदार आहेत.

Web Title: 13 thousand votes of 'coordination' team jivari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.