१३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:33 PM2017-10-24T23:33:23+5:302017-10-24T23:34:01+5:30

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे.

130 cozy water reserved for drinking | १३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

१३० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित

Next
ठळक मुद्देदुष्काळाची चाहूल : जिल्ह्यातील ८५० गावांना धोक्याची घंटा

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून याची पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. डिसेंबरनंतर ८५० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ६५ टक्के पाऊस झाला. त्यातही सर्वात कमी पाऊस कळंब, यवतमाळ व राळेगाव तालुक्यात नोंदविण्यात आला. अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील कोणत्याही नदीला पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस नदीपात्र वाळवंट झाले आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील प्रकल्पाची पातळीही वाढली नाही.
जिल्ह्यात एक मोठा आणि सहा मध्यम प्रकल्प आहे. सध्या पूस प्रकल्पात २३.६५ टक्के, अरुणावती प्रकल्पात २३.९९ टक्के, गोखी प्रकल्पात १४.९६ टक्के, वाघाडीत १८.३६ टक्के, अडाणमध्ये २७.६५ टक्के, बोरगावमध्ये ११.९५ टक्के आणि बेंबळा प्रकल्पात २९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट घोंगावत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील १३० दशलक्ष घनमीटर पाणी प्रशासनाने आरक्षित केले आहे. आरक्षणासाठी एका सूत्राचा वापर केला असून त्यात ३३ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पाचे संपूर्ण पाणी आरक्षित राहणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक पाणी असेल अशा ठिकाणी गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. टँकर अथवा लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातूनही पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील १७० गावांत, डिसेंबरमध्ये २३० आणि जानेवारीनंतर ३६० गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वर्तविला जात आहे. मार्च ते जूनपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातच पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज भूजलअभ्यासकांनी वर्तविला आहे.
भूजल पातळी एक मीटर घटली
अपुºया पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी तब्बल एक मीटरने खालावली आहे. साधारणत: जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी ०.२० इंच इतकी खाली गेली आहे.
यवतमाळ शहरासाठी पाणी चिंतेचा विषय
जिल्हा मुख्यालय यवतमाळची लोकसंख्या आणि त्या तुलनेत शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यवतमाळ शहरासाठी पाणी हा विषय चिंतेचा होणार आहे. निळोणा प्रकल्पात आठ टक्के तर चापडोहमध्ये १६ टक्के जलसाठा आहे. डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल असे जीवन प्राधिकरण सांगत आहे. यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पाचे दहा दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरात पाणी आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. परंतु यवतमाळकरांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार हे निश्चित. यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार, याकडे लक्ष लागले आहे.
रबीसाठी नऊ हजार हेक्टरलाच मिळणार पाणी
यावर्षी जल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम रबी हंगामाच्या सिंचनावर होणार आहे. दरवर्षी जलप्रकल्पातून साधारणत: ४० हजार हेक्टर ओलित होते. परंतु यावर्षी सायखेडा आणि अधर पूस या दोन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाईल. त्यावर केवळ नऊ हजार हेक्टर ओलित करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे ३१ हजार हेक्टरवर रबीच्या पेरणीला प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही.

Web Title: 130 cozy water reserved for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.