१३०० पाणीपुरवठा योजनांना बसणार शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 09:59 PM2017-12-24T21:59:25+5:302017-12-24T21:59:36+5:30

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.

1300 water supply schemes will be shocked | १३०० पाणीपुरवठा योजनांना बसणार शॉक

१३०० पाणीपुरवठा योजनांना बसणार शॉक

Next
ठळक मुद्देजोडणी तोडणार : ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची २३ कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेचे बील भरण्यास हयगय केल्याने त्यांच्याकडे तब्बल २३ कोटी रूपये थकीत आहेत. या थकीत बिलापोटी महावितरणने एक हजार ३०६ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागात उन्हाळ्यापूर्वीच पाणी पेटणार आहे.
जिल्ह्यात सध्या ११९८ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत दोन हजारांच्यावर गावे आहेत. यापैकी १३०६ गावांमधील पाणीपुरवठा योजनांकडे पाणीपुरवठ्याचे २३ कोटींचे बील थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी बिल भरले नाही. गेल्यावर्षी एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरून चालू बिल भरण्याची सवलत वीज कंपनीने पाणी पुरवठा योजनांना दिली होती. या योजनेत सर्व ग्रामपंचायतांनी सहभाग नोंदविला. मात्र, पुढील थकबाकी ग्रामपंचायतींनी भरलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १३०६ पाणी पुरवठा योजनांकडे २३ कोटी ९४ लाख रूप्ये थकून राहिले.
आता वीज वितरण कंपनीला वरिष्ठ पातळीवरून थकीत पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे महावितरण या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी नियोजन करीत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास दुष्काळी स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. उन्हाळ्यापूर्वीच या गावांमध्ये पाणी पेटणार आहे. दुष्काळी स्थितीमुळे रोजगार नसल्याने ग्रामपंचायतींची पाणी कराची वसुली थांबली आहे. परिणामी त्यांना पाणी पुरवठ्याचे थकीत बिल भरता आले नाही. आता वीज पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातच पाण्याची समस्या उभी ठाकणार आहे.
पथदिव्यांची थकबाकी २८८ कोटी
गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर पथदिवे लाईट लावण्यात आले. नगरपालिका व नगरपंचायतीत सर्वाधिक पथदिवे आहेत. हे लाईट पादचाºयांना रस्ता दाखवतात. मात्र, त्यांचे बिलच भरण्यात आले नाही. यामुळे २४८८ पथदिव्यांच्या योजनांकडे तब्बल २८८ कोटींची थकबाकी आहे. या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास गावांमध्ये अंधार पसरणार आहे.
पाणी पुरवठ्याच्या थकीत बिलासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कंपनीला सूचना मिळाल्या आहे. या योजनांची वीज जोडणी कापण्याचे आदेश आले आहे.
- रामेश्वर माहुरे
अधीक्षक अभियंता, महावितरण.

Web Title: 1300 water supply schemes will be shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.