नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांनी फसवणूक
By admin | Published: March 12, 2017 12:47 AM2017-03-12T00:47:31+5:302017-03-12T00:47:31+5:30
विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची १४ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली.
दारव्हा : विविध विभागात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची १४ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. प्रकरणी गजानन मंगल गिरी (५५) रा. पाचोरा जि. जळगाव याला अटक करण्यात आली आहे.
महेश पुरुषोत्तम गिरी रा. निंभा, बाबाराव कोंडबाजी जाधव रा. दारव्हा, विनोद नंदराम साठवणे रा. गांगला जि. गोंदिया, वामन माधवराव सुरसकार रा. दारव्हा यांच्याकडून गजानन गिरी याने २० जानेवारी ते २२ मार्च २०१६ या कालावधीत नोकरीचे आमिष दाखवून रकम उकळली. वन विभाग, महसूल, रेल्वे, परिवहन महामंडळ आदी ठिकाणी नोकरी लावून देण्याची बतावणी केली. या चौघांकडूनही त्याने १४ लाख ४० हजार रुपये उकळले. मात्र नोकरी लागली नाही. पैसेही परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर गजानन गिरीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. दारव्हा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पाचोरा येथून अटक केली. ही कारवाई ठाणेदार अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, शिपाई इकबाल शेख यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)