नेरमध्ये १४ शाळा १०० टक्के पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:16+5:30

दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातील १४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा तन्मय किशोर सोसे हा ९७.६० टक्के गुण घेत तालुक्यातून पहिला आला आहे. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव्हाण हिने ९७ टक्के गुण घेत उज्ज्वल यश संपादन केले.

14 schools in Ner pass 100 percent | नेरमध्ये १४ शाळा १०० टक्के पास

नेरमध्ये १४ शाळा १०० टक्के पास

Next
ठळक मुद्देबाभूळगाव तालुक्यातील सहा शाळा चमकल्या : कळंबमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातील १४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा तन्मय किशोर सोसे हा ९७.६० टक्के गुण घेत तालुक्यातून पहिला आला आहे. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव्हाण हिने ९७ टक्के गुण घेत उज्ज्वल यश संपादन केले.
१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांमध्ये इलिगंट हायस्कूल नेर, हरिकमल विद्यालय खरडगाव, रामदासजी आठवले माध्यमिक विद्यालय नबाबपूर, शिवाजी हायस्कूल नेर, शांतीनिकेतन हायस्कूल नेर, रासवी मोझर, वसंतराव नाईक विद्यालय उत्तरवाढोणा, खाकीनाथ विद्यालय अडगाव, राजारामजी विद्यालय मालखेड, अन्नपूर्णा तिमाने विद्यालय पिंपरी(कलगा), प्रियदर्शिनी उर्दू हायस्कूल नेर, रमाई आदिवासी आश्रमशाळा बाणगाव, जीवन विकास विद्यालय नेर, मौलाना आझाद हायस्कूल नेर, शासकीय विद्यालय नेरचा समावेश आहे.
जिजामाता कन्या विद्यालय नेरने ९८.४६ टक्के, मातोश्री हंसाबाई आठवले शाळा चिकणी(डोमगा) ९१.२, दि इंग्लिश हायस्कूल नेरने ९७.८६ टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल माणिकवाडा ९३.८४, डॉ. जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल नेर ९६.५१, डॉ. आंबेडकर विद्यालय वटफळी ९३.६९, अंबिका विद्यालय मांगलादेवी ९७.९५, सारंगपूर विद्यालय सारंगपूरने ९६ टक्के निकाल दिला आहे.
इलिगंटमधील अस्मीरा हुसेन शेख (९५ टक्के), कादंबरी गेडाम (९१), कोमल राजेश छाजेड (९१), बरेर फातेमा खान (९०), तर आस्था कोठारी हिने ९३ टक्के गुण घेत यश मिळविले. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव्हाण (९७ टक्के), कुणाल विजय आडे (९६.८०), रसिका सुनील धांडरकर (९५.४०), शैलेश राजू हलकारे (९५.४०), श्रृती सुनील सुने (९५.४०), तर रमाई आदिवासी आश्रमशाळेच्या पूजा शंकर डाखोरे हिने ९० टक्के गुण घेत यश मिळविले.
बाभूळगाव : सहा शाळा १०० टक्के
बाभूळगाव : दहावीच्या परीक्षेत तालुक्यातील सहा शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. यासोबतच ग्रामीण भागातील शाळांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.
केशवराज महाराज हायस्कूल पहूर, जिल्हा परिषद हायस्कूल राणीअमरावती, अल्लामा इकबाल उर्दू हायस्कूल बाभूळगाव, नूर उर्दू हायस्कूल राणीअमरावती, विठ्ठल मंदिर माध्यमिक विद्यालय खर्डा, माणिकराव पांडे (पाटील) विद्यालय बाभूळगाव या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
प्रताप विद्यालय बाभूळगावने ९०.८७ टक्के निकाल दिला आहे. दाभा येथील पन्नालाल लुणावत शाळेचा निकाल ९८.११, जिल्हा परिषद हायस्कूल सरूळ ९५.६५, शिवाजी हायस्कूल घारफळ ९३.१५, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय चिमणापूर ९७.१५, वसंतराव नाईक हायस्कूल आसेगाव(देवी) ९७.१४, तथागत विद्यालय कोटंबा ९३.६, संत गाडगेबाबा विद्यालय वाटखेड ८६, उर्दू हायस्कूल सावर ९५.६५, सुदाम विद्यालय सुकळी ९०.४७, नानीबाई घारफळकर विद्यालय बाभूळगाव ७३.६८, मदनेश्वर आदिवासी आश्रमशाळा मादणी ८८, जिल्हा परिषद विद्यालय सावर ९१.१७, स्वामी समर्थ आश्रमशाळा मांगुळ ८४.३७ टक्के निकाल लागला. सर्वात कमी निकाल कोल्ही येथील पांडे पाटील प्राथमिक विद्यालयाचा ७२.९७ टक्के लागला आहे.

राळेगावचा निकाल ९२.४१ टक्के
राळेगाव : दहावीच्या परीक्षेत राळेगाव तालुक्याने ९२.४१ टक्के निकाल दिला आहे. परीक्षेस बसलेल्या १३५८ विद्यार्थ्यांपैकी १२५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ९६ टक्के गुण घेत तुलसी पंकजकुमार तोतला ही तालुक्यातून पहिली आली आहे. ती न्यू इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. प्राचार्य सुरेंद्र ताठे, उपमुख्याध्यापक प्रा. अशोक पिंपरे, पर्यवेक्षक मोहन देशमुख आदींनी तिचा गौरव केला. १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांमध्ये गुरुदेव विद्या मंदिर वरद, पोस्ट बेसिक आश्रमशाळा सावरखेडा, रामचंद्र महाराज आश्रमशाळा खैरगाव, राजर्षी शाहू महाराज विद्यालय गुजरी, महावीर इंग्लिश स्कूल राळेगाव आणि स्मॉल वंडर हायस्कूल वडकीचा समावेश आहे. न्यू इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९३.९८ टक्के, नेताजी विद्यालय राळेगाव ८१.९६, संत गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव ८३, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय धानोरा ७५, माध्यमिक कन्या विद्यालय वडकी ८६, रेणुकाबाई देशमुख विद्यालय दहेगाव ७९, सोनामाता हायस्कूल चहांद ९२, संस्कृती संवर्धन कन्या शाळा राळेगाव ९७, शांतादेवी कोळसे विद्यालय सावरखेडा ९०, पुर्णिमा माध्यमिक विद्यालय सावनेर ८१, सर्वोदय विद्यालय रिधोरा ९१, महात्मा जोतिबा फुले विद्यालय वाढोणाबाजार या शाळेचा निकाल ९६ टक्के लागला आहे.

कळंब तालुक्याचा निकाल ९२.६८ टक्के
कळंब : दहावीच्या परीक्षेचा कळंब तालुक्याचा निकाल ९२.६८ टक्के लागला आहे. चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळांनीही उज्ज्वल यश संपादन केले आहे. सावरगाव येथील नेहरू विद्यालयाची विद्यार्थिनी नीकिता वाल्मीक शेंडे हिने ९५.४० टक्के गुण घेत यश मिळविले. कळंब येथील संस्कार इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अजय देवानंद भारती हा ९५ टक्के गुण घेत उत्तीर्ण झाला आहे.

Web Title: 14 schools in Ner pass 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.