लाडखेडजवळील अपघातात १४ विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 01:10 PM2018-09-08T13:10:34+5:302018-09-08T13:12:06+5:30

यवतमाळमधील लाडखेडजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला आहे.

14 students injured in auto rickshaw accident near yavatmal | लाडखेडजवळील अपघातात १४ विद्यार्थी जखमी

लाडखेडजवळील अपघातात १४ विद्यार्थी जखमी

यवतमाळ : यवतमाळमधील लाडखेडजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचालकासह 14 विद्यार्थी जखमी झाले. यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी (8 सप्टेंबर) सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. 

पुणे येथून येणारी ट्रॅव्हल्स भरधावे वेगाने प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जात होती. याचवेळी दारव्हा तालुक्यातील बानायत येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा बानायत येथून लाडखेडला जात होती. त्याचदरम्यान लाडखेड येथील बसस्थानकाजवळील पुलाजवळ ट्रॅव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षातील 13 विद्यार्थी आणि चालक असे 14 जण जखमी झाले. त्यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहे.

अपघातातील जखमींना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑटोरिक्षा चालक सुभाष ठाकरे (38) जखमी असून त्यांचा मुलगा पूर्वेश सुभाष ठाकरे व धम्मा शिरसाट हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. 

अपघाता झाला त्यावेळी रस्त्याने शेळ्यांचा कळप जात होता. शेळ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोरिक्षा चालकाने बाजूने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी लाडखेडचे ठाणेदार सारंग मिराशी यांच्यासह पोलीस ताफा दाखल झाला. त्यांनी जखमींना उपचारार्थ हलविण्यास मदत केली.


 

Web Title: 14 students injured in auto rickshaw accident near yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.