शाळेच्या आॅटोरिक्षाला ट्रॅव्हल्सची धडक, १४ विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:11 PM2018-09-08T22:11:36+5:302018-09-08T22:12:00+5:30
भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत आॅटोचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावर लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला दिलेल्या धडकेत आॅटोचालकासह १४ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावर लाडखेड बसस्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडली.
पुणे येथून येणारी ट्रॅव्हल्स भरधाव चंद्रपूरकडे जात होती. याचवेळी बानायत (ता. दारव्हा) येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा आॅटोरिक्षा लाडखेडकडे जात होता. लाडखेड बसस्थानकाजवळील पुलाजवळ ट्रॅव्हल्सने आॅटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात १३ विद्यार्थी आणि आॅटोचालक, असे १४ जण जखमी झाले. दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहे. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. आॅटोरिक्षा चालक सुभाष ठाकरे (३८) रा. जांभोरा जखमी असून त्यांचा मुलगा पूर्वेश सुभाष ठाकरे व स्वप्नील शिरसाट हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
या अपघातामध्ये अर्पित ठाकरे (८), पायल विष्णू इंगोले (१५), अमृता ज्ञानेश्वर चतुरकार (१३), भाग्यश्री दीपक सिडाम (१४), भावेश ज्ञानेश्वर चतुरकर (९), पायल सुभाष आंबेकर (१३), ऋषिकेश किशोर साठे (९) ढवळसर, दर्शना चतुरकर, सपना वसंत आंबेकर (१६), सुभाष अांबेकर (५), प्रवणी देवराव चतुरकर सर्व रा. बानायत यांचा यामध्ये समवेश आहे. यातील सपना आंबेकर आणि स्वप्नील शिरसाट यांना नागपूर येथे हलविण्यात आले. शेळ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.