सोन्याच्या मोहात गमावले १५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:07+5:30

आरोपींनी सोन्यासारखी नाणी दाखविली. लाळगे यांची खात्री पटल्यावर त्यांना पैसे घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर बोलविण्यात आले. लाळगे चालकाला घेऊन पोहोचले. तेथे दबा धरून असलेल्या पाच ते सहा जणांनी लाळगे व त्यांच्या चालकावर हल्ला चढवीत १५ लाखांची रोख हिसकावून घेतली. पैसे घेऊन आरोपींनी पोबारा केला. जीव वाचला म्हणून लाळगे परतले. तब्बल चार दिवसानंतर त्यांनी याप्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

15 lakhs lost in gold temptation | सोन्याच्या मोहात गमावले १५ लाख

सोन्याच्या मोहात गमावले १५ लाख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदकाम करीत असताना पाच किलो सोने सापडले आहे. ते घ्यायचे असेल तर १५ लाख रुपये घेऊन या, अशी टीप मुकादमाने स्वत:च्या मालकालाच दिली. सोन्याच्या लालची पडलेला मालक १५ लाखाची रोख घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर पोहोचला. येथे त्याला मारहाण करून त्याची रोख हिसकावून आरोपींनी पळ काढला. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. 
सागर युवराज लाळगे (३८) रा. बहिरोबावाडी ता. कर्जत जि. अहमदनगर असे फसवणूक झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. सागर लाळगे यांनी पाईपलाईन टाकण्याचे कंत्राट घेतले आहे. त्यांच्या कामावरीलच मुकादम पिराजी याने सागर लाळगे यांना पाच किलो सोने खोदकामात मिळाल्याची माहिती दिली. ही माहिती खरी आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी सागर लाळगे व त्याचा चालक मनोहर तांदळे हे दोघे उमरखेडला आले. त्यावेळी आरोपींनी सोन्यासारखी नाणी दाखविली. लाळगे यांची खात्री पटल्यावर त्यांना पैसे घेऊन मुळावा ते शेंबाळपिंपरी रोडवर बोलविण्यात आले. लाळगे चालकाला घेऊन पोहोचले. तेथे दबा धरून असलेल्या पाच ते सहा जणांनी लाळगे व त्यांच्या चालकावर हल्ला चढवीत १५ लाखांची रोख हिसकावून घेतली. पैसे घेऊन आरोपींनी पोबारा केला. जीव वाचला म्हणून लाळगे परतले. तब्बल चार दिवसानंतर त्यांनी याप्रकरणी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मुकादम पिराजी व त्याच्या पाच साथीदारांवर कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वारंवार घटना, मोह सुटेना 
- मोठ्या प्रमाणात सोने असून ते विकायचे असल्याचे सांगत विशिष्ठ ठिकाणी बोलावून लुटमार झाल्याच्या यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतरही सोन्याचा मोह सुटताना दिसत नाही. 

 

Web Title: 15 lakhs lost in gold temptation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.