८ महिन्यांत विदर्भात १५ वाघांचा मृत्यू; कारवाई कुणावरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:09 PM2018-01-01T15:09:32+5:302018-01-01T15:10:58+5:30

विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही.

15 tigers death in Vidarbha in 8 months; There is no action | ८ महिन्यांत विदर्भात १५ वाघांचा मृत्यू; कारवाई कुणावरच नाही

८ महिन्यांत विदर्भात १५ वाघांचा मृत्यू; कारवाई कुणावरच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देवन खात्याचा कारभार झुंज, आजार, वृद्धापकाळाची कारणे

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तीन आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर वन खात्याने दिलेल्या उत्तराने ही माहिती उघड झाली आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यात विदर्भात एकूण १५ वाघ मृत्युमुखी पडले. शिकारीच्या उद्देशाने यातील काहींचा बळी गेल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात वन खात्याने ही बाब नाकारली आहे. १५ पैकी दहा वाघांचे मृत्यू हे आपसी झुंज, आजारपण, वृद्धापकाळ अशा विविध नैसर्गिक कारणांनी झाल्याचे सांगितले जाते. दोन वाघांचा मृत्यू शेतातील कुंपणाला लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे झाला. तर तीन वाघांचा मृत्यू अन्य कारणांनी झाल्याचे म्हटले आहे. वाघाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन शेतकऱ्यांवर वन गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, वन खात्यातील कुणावरही वाघाचे एवढे मृत्यू होवूनही कारवाई केली गेली नाही. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची हाडे, नखे, दात जप्त केले गेले. त्यात वन गुन्हाही नोंदविला गेला. पुढे तपासात अशा पद्धतीने तीन वाघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने विविध १७ जणांना अटक केली गेली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु संबंधित विभागातील वन अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही वाघांच्या या मृत्यूचा त्रास झाल्याचे ऐकिवात नाही.

Web Title: 15 tigers death in Vidarbha in 8 months; There is no action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ