आवास योजनेपासून १५० लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 05:00 AM2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:02+5:30
पंतप्रधान योजनेअंतर्गत शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ज्या व्यक्तीकडे जागा नाही, असे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या जागेवर वास्तव्यास आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागा मोजणीसाठी विलंब केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील १५० गरिब कुटुंबातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागेची मोजणी करण्यास विलंब होत असल्याने हे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान योजनेअंतर्गत शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ज्या व्यक्तीकडे जागा नाही, असे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या जागेवर वास्तव्यास आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून जागा मोजणीसाठी विलंब केला जात आहे. काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात या लाभार्थ्यांना जागेचे पट्टे देऊ, असे सांगितले होते. मात्र त्यांना अद्यापही जागेचे पट्टे मिळाले नाही. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली असता, येथील भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मोजणीसाठी विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सर्व प्रक्रियेत घरकुल लाभार्थ्यांची मात्र कुचंबना होत असून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याबाबत ते संभ्रमात आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.