यवतमाळमध्ये 151 नवे कोरोना बाधित, चौघांचा मृत्यू, 212 जण ठणठणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:56 PM2021-03-08T18:56:01+5:302021-03-08T18:58:18+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. (Yavatmal)
यवतमाळ- जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 151 नवे कोरोना बाधित आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, कोविड केअर सेंटर्स आणि कोविड हेल्थ सेंटरमधील 212 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. (151 new corona infected, four killed in Yavatmal)
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील 55 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील 58 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या 151 जणांमध्ये 95 पुरुष आणि 56 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळमधील 58 रुग्ण, पुसद येथील 34, पांढरकवडा 13, महागाव 12, नेर 8, दिग्रस 7, कळंब 3, आर्णि 2, बाभुळगाव 2, दारव्हा 2, घाटंजी 2, राळेगाव 1, वणी 1, उमरखेड 1, झरीजामणी 1 आणि 4 इतर शहरातील रुग्ण आहेत.
सोमवारी एकूण 801 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 151 जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर 650 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1872 ॲक्टीव्ह रुग्ण आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 19425 झाली आहे. 24 तासांत 212 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण रुग्णांची संख्या 17071आहे. तर जिल्ह्यात एकूण 482 मृत्यूंची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 173663 नमुने पाठविले असून यापैकी 171845 प्राप्त तर 1818 अप्राप्त आहेत. तसेच 152420 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने सांगितले आहे.