१५२ रक्तदात्यांची बाबूजींना आदरांजली
By admin | Published: July 3, 2015 12:14 AM2015-07-03T00:14:33+5:302015-07-03T00:14:33+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान
रक्तदान शिबिर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जयंती
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या शिबिरात १५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली अर्पण केली.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, लोकमत परिवार आणि प्रेरणास्थळ आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन माजी प्राचार्य शंकरराव सांगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचे संचालक माणिकराव भोयर, प्रेरणास्थळ आयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ.जेकब दास, प्राचार्य के.के. कश्यप, प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा, प्राचार्य डॉ.राजेंद्र रामटेके, विलास देशपांडे उपस्थित होते.
या शिबिरात अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे आकाश माळवी, भास्कर झळके, प्रदीप वाघमारे, राहुल भोयर, संजय नेमाडे, नीळकंठ जवंजाळ, अभय मुसकुटे, सचिन सोनवाल, चव्हाण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)