एसटीचे १५५ चालक, वाहक कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:07+5:30
चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या मंडपात सरकारच्या भूमिकेचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील एकूण १५५ चालक, वाहक कामावर रुजू झाले आहेत. रविवारपर्यंत विविध प्रवर्गांतील ४९४ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली आहे. मात्र, एसटी बसेस मार्गावर निघाल्या नाहीत. संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या २०४२ इतकी आहे.
चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या मंडपात सरकारच्या भूमिकेचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या यवतमाळ येथील संपाचा रविवारी ३१ वा दिवस उजाडला. हा कालावधी जसजसा वाढत आहे, तसतसे कर्मचारी कामावर जाण्याची संख्याही वाढत आहे. प्रशासकीय संवर्गातील ३५१ पैकी २६२ कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली. कार्यशाळेतील ४१४ पैकी ७७ कर्मचारी रुजू झाले आहेत.
महामंडळाने कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्याची कारवाईसुद्धा केली आहे. यानंतरही चालक-वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी कामावर जाण्यास तयार नाही.