यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित; जिल्ह्याची संख्या ५० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 07:24 PM2020-04-26T19:24:39+5:302020-04-26T19:24:58+5:30

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे.

16 positive in Yavatmal district on Sunday; The number of districts is over 50 | यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित; जिल्ह्याची संख्या ५० वर

यवतमाळ जिल्ह्यात रविवारी १६ जण कोरोनाबाधित; जिल्ह्याची संख्या ५० वर

googlenewsNext
ठळक मुद्दे50 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून रविवारी आणखी 16 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. त्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे. 26 एप्रिल रोजी सकाळी पॉझेटिव्ह रिपोर्ट आलेले सात रुग्ण सुरवातीला संस्थात्मक विलगीकरणात भरती होते. मात्र त्यांचे पॉझेटिव्ह अहवाल प्राप्त होताच त्यांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. तर दुपारी आणखी 9 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे दिवस•ारात 16 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता 50 पॉझेटिव्ह रुग्णांसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 298 जण भरती आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
रविवारी एकूण 39 जण नव्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहेत. नागपूर येथे तपासणीकरीता आज 64 नमुने पाठविले असून सद्यस्थितीत 264 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. संस्थात्मक विलगीकरणात 166 जण तर गृह विलगीकरणात एकूण 829 जण आहे.

प्रशासनाचे आवाहन

कोरोना विषाणुचा विळखा यवतमाळ शहराला घट्ट होत आहे. रुग्ण संख्येत दररोज वाढ होत आहे. तरीसुध्दा नागरिकांकडून निष्काळजीपणा होत आहे. तसेच नागरिक अजूनही याबाबत सजग नसून काही नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. घराच्या बाहेर गेल्याशिवाय शक्य नाही असेच काही अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे. मात्र सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे. कोणालाही आरोग्यविषयक समस्या असेल तर नागरिकांनी स्वत:हून समोर यावे. तसेच आरोग्य यंत्रणेला माहिती देऊन उपचार करून घ्यावे. कोणत्याही पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी किंवा आपल्या कुटुंबापैकी कोणी अशा रुग्णांच्या संपर्कात आले असेल तर स्वत:हून प्रशासनाशी संपर्क करा. जेणेकरून कोरोनाचा प्रसार इतरत्र होणार नाही. सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहे. कुठेही गर्दी करू नका. अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानेच कोरोनाला आपण हद्दपार करू शकतो. त्यामुळे यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले आहे.

Web Title: 16 positive in Yavatmal district on Sunday; The number of districts is over 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.