पुसद-नेर रस्त्यासाठी १६६ कोटी

By admin | Published: May 4, 2017 12:30 AM2017-05-04T00:30:51+5:302017-05-04T00:30:51+5:30

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुसद-दिग्रस-नेर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १६६ कोटी रुपये मंजूर केले आहे.

166 crores for Pusad-Ner road | पुसद-नेर रस्त्यासाठी १६६ कोटी

पुसद-नेर रस्त्यासाठी १६६ कोटी

Next

चौपदरीकरण : दर्जेदार कामासाठी प्रथमच लिडार मशीनचा वापर
पुसद : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने पुसद-दिग्रस-नेर या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १६६ कोटी रुपये मंजूर केले आहे. या रस्त्याच्या कामात गुणवत्ता राखण्यासाठी प्रथमच लिडार मशीनचा वापर केला जाणार आहे. पुसद-नेर रस्त्याच्या चौपदरीकरणाने या मार्गावरील अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे.
पुसद ते नेर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरात दिली आहे. या कामासाठी १६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पुसदपासून नेरपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. याचा फायदा दिग्रस, दारव्हा या तालुक्यांनाही होणार आहे. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने वाहतूक सुकर होणार असून अत्यंत कमी वेळात मराठवाड्यातून अमरावती येथे जाणे शक्य होणार आहे. काम गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी लिडार मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. दोन कोटी रुपये किंमत असलेल्या लिडार मशीनचा उपयोग यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच केला जात आहे. या मशीनद्वारे रस्त्याची लेव्हल, मध्यबिंदू काढून रस्त्याचे नूतनीकरण, बांधकाम, डांबरीकरण ही सर्व कामे उच्च दर्जाची केली जातात. विशेष म्हणजे ही मशीन थेट उपग्रहाशी जोडली राहणार आहे. त्यामुळे या कामात पारदर्शकता येऊन काम दर्जेदार होणार आहे. पुसद ते नेर मार्गावर असलेल्या गावावरून हा रस्ता जाणार आहे. आतापर्यंत हा रस्ता दुपरी असल्याने वाहतुकीस अडथळा ठरतो. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. परिणामी वाहनधारक दुसऱ्या पर्यायी रस्त्याचा शोध घेतात. परंतु मराठवाड्यात जाण्यासाठी अमरावतीवरून हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. त्यामुळे वाहनधारकांचा नाईलाज होतो. आता १६६ कोटी रुपये खर्च करून हा रस्ता चौपदरी केला जात आहे.
लिडार मशीन पुसद येथे दाखल झाली असून या कामाची पाहणी कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे आणि उपविभागीय बांधकाम अभियंता रवींद्र मालवत यांनी केली आहे. यावेळी तंत्रज्ञ ए.आर. राठोड आणि शासकीय कंत्राटदार राजेश आसेगावकरही उपस्थित होते. पुसद ते नेर हा रस्ता लवकरच चौपदरीकरण होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: 166 crores for Pusad-Ner road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.