१७ कोटींचा क्रीडा विकास पूर्णत्त्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:09 PM2019-05-28T22:09:07+5:302019-05-28T22:10:02+5:30

येथील गोधनी रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात पावणे सात कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉलचे अ‍ॅस्ट्रोटर्फ ग्राऊंड, सिंथेटिकचे व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो ग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक आदी तब्बल साडेतेरा कोटी रुपयांची कामे पूर्णत्वाकडे असून सिंथेटिकचे बास्केट बॉल व लॉन टेनिस कोर्ट खेळाडूंसाठी सज्ज झाले आहे.

17 crore sports development fullness | १७ कोटींचा क्रीडा विकास पूर्णत्त्वाकडे

१७ कोटींचा क्रीडा विकास पूर्णत्त्वाकडे

Next
ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुल : सिंथेटिक ट्रॅक जूनमध्ये, बास्केटबॉल व लॉन टेनिस कोर्ट सज्ज

नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील गोधनी रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात पावणे सात कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर लांबीचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉलचे अ‍ॅस्ट्रोटर्फ ग्राऊंड, सिंथेटिकचे व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो ग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक आदी तब्बल साडेतेरा कोटी रुपयांची कामे पूर्णत्वाकडे असून सिंथेटिकचे बास्केट बॉल व लॉन टेनिस कोर्ट खेळाडूंसाठी सज्ज झाले आहे.
यवतमाळच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा बिंदू ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक ट्रॅकचे गतवर्षी १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. या ट्रॅकसाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ६.८३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कृत्रिम हिरवेकंच गवत लावल्या जाणार आहे. ग्राऊंडवर पावसाचे पाणी साचू नये यासाठी फुटबॉल ग्राऊंडवर सिलिका सँड अंथरणे सुरू आहे. या सिलिकामुळे पाणी शोषले जाऊन ते थेट नालीत जाणार आहे.
फुटबॉल जाळीच्या मागे डी झोनमध्ये सिंथेटिकचे व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो ग्राऊंडवर तयार केले जात आहे. या डी झोन-साठी जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे.
बॅडमिंटन हॉलचेही नूतनीकरण सुरू असून या हॉलमध्ये आता चार ऐवजी सहा बॅडमिंटन कोर्ट राहणार आहेत. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ड्रेनेज स्केलेटरचे फ्लोरिंग केले जात आहे. त्यामुळे भविष्यात यवतमाळ येथे राष्ट्रीय दर्जाचे सामनेही या कोर्टवर खेळता येईल. या कोर्टच्या नूतनीकरणासाठी एक कोटी २० लाख रुपयाचा खर्च मंजूर झाला आहे.
सध्या क्रीडा संकुलात बास्केट बॉल व लॉन टेनिस कोर्टवर सिंथेटिकचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. बॅडमिंटन हॉलच्या बाजूलाच साडेतीन कोटी रुपयांचे बहुद्देशीय हॉलचे काम हाती घेतले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या मानकानुसार तयार होणाºया या सिंथेटिक ट्रॅकचे काम नांदेडच्या कृष्णा एंटरप्राईजेस या कंपनीकडे सोपविले आहे. नऊ महिन्यात या ट्रॅकचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. सध्या या ट्रॅकचे संपूर्ण खडीकरण, डांबरीकरण झाले असून सिमेंटचे पहिले ग्लू लेअर झाले आहे. १३ एमएम जाडीच्या या सिंथेटिक ट्रॅकवर तीन लेअर राहणार आहेत. सध्या एक सेंटीमीटरचा लाल दाणेदार मातीसारख्या पॉलियरेथेनचे रबर कोटींग सुरू आहे. तिसºया व अंतिम थरामध्ये ईपीडीएम ग्रॅन्युअल्स स्प्रे कोटींग व आठ लेनचे मार्किंग केले जाईल.
जून महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत ट्रॅकचे काम पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रवीण कुळकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

या ट्रॅकच्या मधोमध फुटबॉलचे अ‍ॅस्टोटर्क ग्राऊंडचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ट्रॅकसाठी चीन देशातील पाच इंजिनिअर देखील राबत आहे. तयार होणारे ट्रॅक हे ‘डस्ट फ्री’ राहणार असून संपूर्ण स्टेडियम सिंथेटिक व नागरिकांना फिरण्यासाठी पेव्हर्स ट्रॅक बसविले जाणार आहे. या सिंथेटिक ट्रॅकचे आयुष्य पंधरा वर्ष असून पहिले तीन वर्ष कृष्णा एंटरप्राईजेस याचे मेन्टेनेन्स करणार आहे.
- प्रवीण कुळकर्णी
उपअभियंता
सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ.

Web Title: 17 crore sports development fullness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.