डॉक्टरला १७ लाखांचा दंड
By admin | Published: June 14, 2014 02:35 AM2014-06-14T02:35:39+5:302014-06-14T02:35:39+5:30
बालरोग तज्ञाच्या निष्काळजीपणामुळे भूमिका सुजित राय या चिमुकलीला कायमचे अंधत्व आले.
यवतमाळ : बालरोग तज्ञाच्या निष्काळजीपणामुळे भूमिका सुजित राय या चिमुकलीला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी दोषी डॉक्टर आणि इन्श्युरन्स कंपनीने भूमिकाला
१७ लाख ६१ हजार रुपयांचा मोबदला द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे, अशी माहिती सुजित राय यांनी पत्रपरिषदेत दिली.
वाघापूर परिसरात राहणारे सुजित रतनलाल राय यांच्या मुलीला ३१ नोव्हेंबर २०११ रोजी डॉ.संजीव लखनलाल जोशी यांच्या जोशी बाल रुग्णालय चिरायू चाईल्ड
क्रिटीकेअर सेंटर येथे दाखल केले होते.मात्र उपचारात हयगय झाल्याने या मुलीला रोप हा कायमचं अंधत्व आणणारा आजारा झाला. हा आजार डॉ.संजीव जोशी यांच्या
निष्काळजीपणामुळेच झाल्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचापुढे सिद्ध झाले आहे.
या खटल्यात डॉ.संजीव जोशी यांच्या बाजूने शहरातील नामांकित प्रसूती तज्ञांनी खोटी साक्ष दिली. तब्बल सात डॉक्टरांच्या साक्षी तपासण्यात आल्या. राष्ट्रीय ग्राहक तक्रार
निवारण न्याय मंच आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच यांच्या विशेष सूचनेवरून दररोज या खटल्याची सुनावणी करण्यात आली. तब्बल ११ महिने २३ दिवस हा
खटला चालला. गुरुवारी न्यायालयाने ६३ पानाचे निकालपत्र दिले. विशेष म्हणजे याच डॉक्टरच्या विरोधात फौजदारी न्यायालयातही खटला सुरू आहे.
न्याय मंचाने भूमिकाच्या उपचारासाठी झालेला खर्च तीन लाख ६१ हजार ६०० रुपये, कायमचे अंधत्व आल्याने तिच्या संरक्षणासाठी ९ लाख रुपये, जीवनाचा आनंद
उपभोगण्यापासून वंचित ठेवल्यामुळे पाच लाख रुपये असा दंड ठोठावला. यापैकी पाच लाख रुपये ओरिएंट इन्श्युरन्स कंपनी लि. यांनी द्यावे, असाही आदेश दिला आहे.
या खटल्यात भूमिकाच्या बाजूने अॅड.विरेंद्र दरणे, अॅड. राजेश चव्हाण, अॅड. अमोल बोरखडे, अॅड. मनोज कारिया, अॅड. शुभांगी दरणे यांनी युक्तीवाद केल्याचे सुजित
राय यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, भूमिकाची आई रोशनी राय उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)