१७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:00:27+5:30

सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या प्रमाणात निधी शासनाकडून येत नसल्याने त्यातील अर्धीही कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे जुनी कामे पूर्ण होण्याआधीच नवी कामे पुन्हा तयार होतात.

1792 crore road, bridge, building construction 'break' | १७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’

१७९२ कोटींच्या रस्ते, पूल, इमारती बांधकामांना ‘ब्रेक’

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : निधीचा अभाव, ६०० कामे

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे शासनाकडून निधीला ब्रेक लागल्याने जिल्ह्यातील रस्ते, पूल व इमारतींची एक हजार ७९२ कोटी २७ लक्ष रुपयांची बांधकामे थांबली आहेत. यातील बहुतांश कामांना मंजुरी मिळालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या प्रमाणात निधी शासनाकडून येत नसल्याने त्यातील अर्धीही कामे मार्गी लागत नाहीत. त्यामुळे जुनी कामे पूर्ण होण्याआधीच नवी कामे पुन्हा तयार होतात. जुन्याच कामांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित राहतात. यावर्षी तर कोरोनामुळे शासकीय योजनांना निधीच मिळाला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याला मार्च महिन्यात निधी दिला गेला. मात्र लगेच बीडीएस प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने हा निधी शासनाने परत घेतला. पर्यायाने कंत्राटदारांची देयके प्रलंबित राहिली. बांधकाम खात्याने यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रस्ताव तयार केले होते. परंतु कोरोनामुळे या प्रस्तावांना ग्रहण लागले. शासनाने आपल्या विभागांकडील बहुतांश निधी परत घेतला. यावर्षी बांधकाम खात्याला अवघ्या ३३ टक्के निधीमध्ये काम चालवावे लागणार आहे.
त्यातच शासनाने ४ मे रोजी आदेश काढला. त्यात नवीन कामांना तांत्रिक प्रशासकीय मान्यता देऊ नये, वर्क आॅर्डर जारी करू नये, निविदा काढल्या जावू नये, असे नमूद केले. त्यामुळे सार्वजनिक बांधकामे ठप्प झाली. ज्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे त्या कामांच्या निविदाही थांबल्या आहेत. आजच्या घडीला जिल्ह्यात रस्ते, पूल व इमारतींची एक हजार ७९२ कोटी २७ लाख रुपयांची एकूण ६०० सार्वजनिक बांधकामे थांबलेली आहेत. त्यामध्ये ६१ इमारती व ५३९ रस्ते-पुलांचा समावेश आहे. वर्क आॅर्डर दिलेली कामे बांधकाम खात्याने कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतली आहे. मात्र निधीअभावी त्यांची देयके थांबलेली आहेत.

शासनाच्या आदेशानुसार कामे थांबविली गेली आहे. रस्ते, पूल व इमारतींचे अंदाजपत्रक तयार आहे. मात्र या कामांना निधीची प्रतीक्षा आहे. वर्क आॅर्डर होवून थांबलेले एकही काम जिल्ह्यात नाही.
- धनंजय चामलवार, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम.

Web Title: 1792 crore road, bridge, building construction 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.