कीटकनाशकाने घेतले 18 जीव, मृत्यूंना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार - किशोर तिवारी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 03:01 PM2017-10-01T15:01:18+5:302017-10-01T15:01:29+5:30

कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली.

18 organisms taken by pesticides, deaths due to malnutrition of agriculture department and health department - Kishore Tiwari | कीटकनाशकाने घेतले 18 जीव, मृत्यूंना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार - किशोर तिवारी  

कीटकनाशकाने घेतले 18 जीव, मृत्यूंना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार - किशोर तिवारी  

Next

यवतमाळ - जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी, गुलाबी बोडअळी, मलिबगचे प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो यांसारख्या अतिविषारी 'कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली. या मृत्यू पडलेल्या शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सरकार प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देणार असल्याची व दवाखान्यावर आलेला संपूर्ण खर्च देणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्च समितीच्या अहवालाच्या नावावर मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा प्रकार आपण हाणून पाडणार असून, या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच तिवारी यांनी केली आहे  
यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मिशनने उमरखेड पुसद, आर्णी, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ, राळेगाव, कळंब, मारेगाव, केळापूर व वणी या ठिकाणी मागील चार दिवसांत दौरे करून माहिती जुळवल्यानंतर जिल्ह्यात सुमारे ७५० रुग्णांमध्ये आदिवासी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समावेश असून, आतापर्यंत 17पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये कीटकनाशकाची बाधा झालेले निरपराध जीव गमावले असून, यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे, आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण, कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर, कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार, उचेगाव गावचे रवी राठोड, पहापळचे विठ्ठलराव पेरकेवार टेंभीचे विलासभाऊ मडावी, मारेगावचे वसंतराव  सिडाम, कालेगाव मारोतराव पिंपळकर, घोडधरा गावांतील दिवाकर घोसी, टाकळी गावचे शंकर कदम, मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले, राळेगावचे सावरगावचे गजाननराव फुलमाळी यांचा समावेश असून, जर आरोग्य विभाग व कृषी विभाग असाच झोपा काढत असल्यास या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: 18 organisms taken by pesticides, deaths due to malnutrition of agriculture department and health department - Kishore Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.