जिल्ह्यात अव्यवस्थेमुळेच ठरले विषबाधेचे १९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 09:13 PM2017-10-04T21:13:11+5:302017-10-04T21:13:35+5:30

अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला.

19 victims of poisoning caused due to chaos in the district | जिल्ह्यात अव्यवस्थेमुळेच ठरले विषबाधेचे १९ बळी

जिल्ह्यात अव्यवस्थेमुळेच ठरले विषबाधेचे १९ बळी

Next
ठळक मुद्देनाना पटोले : कृषी व महसूल विभागातील ६० टक्के पदे रिक्तलोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला.
गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन १९ लोकांचा बळ गेला तर जवळपास सातशे शेतकरी-शेतमजूर बाधित झाले आहे, या पार्श्वभूमिवर बुधवारी खासदार नाना पटोले हे यवतमाळला येऊन गेले. येथील शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूरांची सध्याची स्थिती ही शासन व प्रशासनासाठी भूषणावह नसल्याचे ते म्हणाले. यवतमाळ जिल्हयात शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी विषेश पॅकेजही शासन देत आहे. तरीसुद्धा शेतकºयांच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नसल्याचे ते म्हणाले.
शासनाने फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकºयांना केवळ दोन लाख रुपये जाहीर केले आहे. त्याने शेतकरी-शेतमजूरांचे प्राण वापस येईल का, असे सांगून विषबाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ६० ते ७० हजार रुपये स्वत: उपचारासाठी खर्च करावे लागत असल्याचे ते म्हणाले. देशातील अशाप्रकारची ही मोठी गंभीर घटना यवतमाळ जिल्हयात घडली असताना त्याचे कुणालाही कोणते सोयर-सुतक नसून शासनाने शेतकरी-शेतमजूरांना मरणासाठी सोडल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कृषी व महसूल विभागातील ६० टक्के पदे रिक्त असल्याचे सांगून योग्य व वेळेवर शेतकºयांना मार्गदर्शन मिळाले असते तर हा प्रकार टाळता येऊ शकला असता. परंतु कृषी विभागातील कृषी सहाय्यकांची मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. बीटी कॉटन आल्यानंतरच्या परिणामाबद्दल विचारच केल्या गेला नाही. बियाण्यांचा अभ्यास नाही, त्याचे परिणाम शेतकºयांना भोगावे लागतात. मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बीटीची चौकशी व्हावी आणि या कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच या प्रकरणाच्या सखाले चौकशीसाठी विद्यमान न्यायधीशांच्या अध्यक्षतेत समितीचे गठण करण्याची मागणीसुद्धा आपण करणार असल्याचे नानाभाऊ पटोले म्हणाले.
यासाठी आपण उद्याच दिल्ली येथे जात असून पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे नानाभाऊ म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयाताई धोटे देवानंद पवार, मिलिंद धुर्वे आदी उपस्थित होते.
दोन लाखात नवरा परत मिळेल काय?
फवारणीदरम्यान विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या बंडू सोनुले या शेतमजूराची पत्नी गीता बंडू सानुले पत्रपरिषदेला उपस्थित होती. शासनाने दोन लाख रुपये जाहीर केल्याचे तीला सांगितले असता, मी भीक मागून का होईना शासनाला माझ्याकडून दोन लाख रुपये देईल, त्या बदल्यास शासन माझ्या पतीचे प्राण मला परत आणून देऊ शकेल का, असा प्रश्न तिने उपस्थित केला.
 

Web Title: 19 victims of poisoning caused due to chaos in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.