२० पाणीदार गावे होणार हिरवीगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 10:24 PM2018-07-01T22:24:52+5:302018-07-01T22:25:40+5:30

वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.

20 green areas will be green | २० पाणीदार गावे होणार हिरवीगार

२० पाणीदार गावे होणार हिरवीगार

Next
ठळक मुद्देदारव्हा तालुका : लोकसहभागातून ७५ हजार रोपटी

मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : वॉटर कप स्पर्धेत सहभागी तालुक्यातील २० गावांनी ७५ हजार रोपांची निर्मिती केली. या रोपांची गावागावात लागवड केली जाणार आहे. यातून ही पाणीदार गावे आता हिरवीगार होणार आहे.
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्याची निवड झाल्यानंतर ५० गावे त्यात सहभागी झाली. यापैकी २० गावांनी रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी काशीद, करंज, कडूनिंब, पिंपळ, वड, शेवगा, सीताफळ आदी प्रकारच्या फुले, फळे तसेच सावली देणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या बियांची निवड केली. श्रमदानातून गोळा केलेला तळ्यातील गाळ, दर्जेदार माती, वाळू, शेणखत आदी मिश्रण करून त्यात रोपे लावण्यात आली. या रोपट्यांना सावली मिळावी म्हणून शेडनेटची व्यवस्था केली.
गेल्या दोन महिन्यात लोही, बोरी, लाखखिंड, हातोला, खोपडी, पाथ्रड देवी, धामणगाव (देव), तोरनाळा, भुलाई, कोलवाई, भांडेगाव, हातगाव, पाळोदी, पांढुर्णा, कुºहाड, मुंढळ, हातगाव, बोधगव्हाण, माळेगाव, तपोना येथे ७५ हजार रोपटी तयार झाली. श्रमदानातून परिसरातील सलग समतल चरखाली, तळ्याच्या काठावर, शाळा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी गावकºयांनी घेतली आहे. ‘आपलं गावं’ हिरवगार करायचा संकल्प गावकºयांनी सोडला आहे.

रोपांसाठी शासनाचा छदामही खर्च झाला नाही
वृक्षारोपणासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्चून रोपवाटिका तयार केली जाते. मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे आणि इतर अधिकारी व पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात पहिल्यांदाच लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यात आली. यात शासनाचा छदामही खर्च झाला नाही. यामुळे लोकसहभाग व श्रमदानातून होणारे वृक्षारोपण महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Web Title: 20 green areas will be green

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.