पांढरकवडा परिसरात कापूस चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:14 PM2023-02-16T18:14:41+5:302023-02-16T18:19:58+5:30
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल
पांढरकवडा (यवतमाळ) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतपीक लंपास करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तालुक्यातील रूढा शेतशिवारातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ६० हजार रुपये किमतीचा २० क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
पिंपळखुटा येथील रहिवासी शेतकरी सुधीर संजय रासमवार यांचे रूढा शिवारात शेत आहे. सध्या त्यांच्या शेतात कापसाची वेचाई सुरू आहे. वेचण्यात आलेला कापूस त्यांनी शेतातील बंड्यात ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून १२ फेब्रुवारीला बंड्याचे दार तोडून आत ठेवून असलेला २० क्विंटल कापूस लंपास केला. यामुळे सुधीर रासमवार यांना एक लाख ६० हजार रुपयांचा फटका बसला. घटना उघडकीस आल्यानंतर सुधीर रासमवार यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविचे कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी विविध समस्यांशी झुंजत आहेत. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने धोरणात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करू
- विश्वास नांदेेकर, माजी आमदार