बस अपघातात २० प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:43 PM2018-08-29T23:43:34+5:302018-08-29T23:44:29+5:30

स्थानिक नागपूर मार्गावर राळेगाव येथे जात असलेल्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू जीपने जोरदार धडक दिली. यात एसटीमधील २० प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजता गिलाणी पेट्रोल पंपाजवळ घडला.

20 passengers injured in bus accident | बस अपघातात २० प्रवासी जखमी

बस अपघातात २० प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देचालक गंभीर : नागपूर मार्गावर पेट्रोलपंपासमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक नागपूर मार्गावर राळेगाव येथे जात असलेल्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू जीपने जोरदार धडक दिली. यात एसटीमधील २० प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी १ वाजता गिलाणी पेट्रोल पंपाजवळ घडला.
राळेगाव आगाराचे चालक शैलेष खोपे (३७) रा. चांदोरेनगर यवतमाळ हे एम.एच.४०-एन-८५७० क्रमांकाची बस घेऊन राळेगावकडे जात होते. दुपारची बसफेरी असल्याने या बसमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी होते. मालवाहू जीपच्या (एम.एच-२४-ए-१६८२) चालकाने भरधाव वाहन चालवून एसटी बसला धडक दिली. यात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालकासह २० प्रवासी जखमी आहे. यामध्ये राळेगाव येथे कर्तव्यावर जात असलेले एसटी वाहन मनोज खडके, योगीता चौधरी, मयुरी मेसेकर, शारदा दुबे, पायल मोहुर्ले, साक्षी मानकर यांच्यासह २० जण जखमी झाले. वाहक मोहन ढोके यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने दुसऱ्या बसमध्ये बसवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. महामंडळाकडून जखमींना हजार रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्यांना ५०० रुपये आर्थिक मदतही देण्यात आली. या दोन वाहनाच्या अपघातात एका लुनावर जात असलेले नातू व आजोबा थोडक्यात बचावले. त्यांची दुचाकी पूर्णत: क्षतीग्रस्त झाली. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: 20 passengers injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात