वणी उपविभागात २०० कोटींची रस्ता बांधकामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 05:00 AM2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:55+5:30

पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. वणी-कायर-पाटण हा २२ किलोमीटरचा ४८ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आला. परंतु १८ मार्चला राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर तेव्हापासून हे काम ठप्प आहे. अनेक ठिकाणी कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे.

200 crore road construction jam in Wani subdivision | वणी उपविभागात २०० कोटींची रस्ता बांधकामे ठप्प

वणी उपविभागात २०० कोटींची रस्ता बांधकामे ठप्प

Next
ठळक मुद्देकोरोनाचा प्रभाव : पावसाळा तोंडावर असल्याने कंत्राटदार चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परिणामी वणी, मारेगाव, झरी या तीन तालुक्यात जवळपास २०० कोटी रूपयांची रस्ता बांधकामे ठप्प पडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना कोरोनाने या कामात खोडा घातला आहे. पावसाळा तोंडावर येऊ ठेपल्याने संबंधित कंत्राटदार चिंतेत आहे.
पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. वणी-कायर-पाटण हा २२ किलोमीटरचा ४८ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आला. परंतु १८ मार्चला राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर तेव्हापासून हे काम ठप्प आहे. अनेक ठिकाणी कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे.
यासोबतच खनिज विकास निधीअंतर्गत वणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २२ कोटींची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे ही कामेदेखील ठप्प झाली आहे. यासोबतच नांदेपेरा-मार्डी-खैरी-वडकी हा ४८ कोटी रूपयांचा २२ किलोमीटरचा रस्ता, तसेच ६० कोटी रूपये खर्चाचे खनिज विकास निधीतील रस्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ३० कोटी रूपये खर्चाचे रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पुलासाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे.
यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे कंत्राटदारांची धाकधूक वाढली आहे. पावसात कामे करता येणार नाही. खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे.
 
Web Title: 200 crore road construction jam in Wani subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.